आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करा आपणास काही माहिती ही माहिती असणे गरजेचे असते .प्रत्येक स्पर्धा परीक्षा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा घटक आहे. या घटकाला दुर्लक्ष करून कदाचित केला नाही. त्यामुळे प्रत्येक दिवसाची माहिती असणे तुम्हाला गरजेचं आहे
आजचा जागतिक दिन :
- जागतिक ऊर्जा स्वातंत्र्य दिन

2012 मध्ये पहिल्यांदा नूतनीकरणक्षम ऊर्जा स्त्रोतांच्या मूल्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी साजरा करण्यात आला.
- राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन

आजचा दिनविशेष | 10 जुलै दिनविशेष
- 1499 : पोर्तुगीज संशोधक ‘निकोलो कोएल्हो’, वास्को द गामाचा साथीदार, भारताचा सागरी मार्ग शोधून लिस्बनला परतला.
- 1800 : कोलकाता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना.

- 1850 : मिलार्ड फिलमोर युनायटेड स्टेट्सचे अध्यक्ष बनले.
- 1890 : वायोमिंग अमेरिकेचे 44 वे राज्य बनले.
- 1913 : डेथ व्हॅली, कॅलिफोर्नियामधील तापमान 134°F (57°C) पर्यंत पोहोचले, जे पृथ्वीवरील त्यावेळा पर्यंतचे सर्वाधिक तापमान आहे.
- 1923 : मुसोलिनीने इटलीतील सर्व राजकीय पक्षांवर बंदी घातली.
- 1925 : अवतार मेहेरबाबा यांनी मौनव्रत सुरू केले आणि मृत्यूपर्यंत सलग 44 वर्षे हे व्रत पाळले.
- 1925 : टास या सोव्हिएत युनियन वृत्तसंस्थेची स्थापना झाली.
पोलिस भरती चा पेपर सोडवा
START TEST
- 1940 : ब्रिटनची लढाई म्हणून ओळखले जाणारे हवाई युद्ध सुरू झाले.
- 1947 : मोहम्मद अली जिना पाकिस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल बनले.
- 1962 : टेलस्टार-1 हा पहिला अमेरिकन संचार उपग्रह प्रक्षेपित झाला.
- 1973 : युनायटेड किंगडमपासून बहामासचे स्वातंत्र्य.
- 1973 : पाकिस्तानच्या संसदेने बांगलादेशला मान्यता दिली.
- 1976 : सेवेसो, इटली येथे विषारी हवेची गळती.
- 1978 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची मुंबईत स्थापना.

- 1978 : मॉरिटानियामध्ये लष्करी उठाव.
- 1991 : बोरिस येल्तसिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
- 1992 : पनामाचे माजी राष्ट्राध्यक्ष मॅन्युएल नोरिगा यांना अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी 30 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली.
- 1992 : आर्वी येथील विक्रम इनसॅट भू-केंद्र राष्ट्राला अर्पण केले.
- 1992 : संपूर्ण स्वदेशी उपग्रह इनसॅट-2A, फ्रेंच गयानाच्या कौरो येथून प्रक्षेपित करण्यात आला.
- 1995 : म्यानमारमधील लोकशाही चळवळीच्या नेत्या आंग सान स्यू की यांची 6 वर्षांच्या नजरकैदेतून बिनशर्त सुटका करण्यात आली.
- 2000 : मनुभाई मेहता पुरस्कार शास्त्रज्ञ वि. ग. भिडे यांना जाहीर.
- 2000 : नायजेरियामध्ये फुटलेल्या तेलाच्या पाइपलाइनचा स्फोट झाला, गळती होणारे तेल गोळा करण्याचा प्रयत्न करत असलेल्या 250 लोकांचा मृत्यू झाला.