महाराष्ट्र पोलिस भरती चालक टेस्ट (Maharashtra Police Driving Test)

चालक पोलीस साठी उपयुक्त फ्री ऑनलाईन टेस्ट

0%
0 votes, 0 avg
72

Current Affairs Free Online Mock Test 2023

पोलिस भरती चालक टेस्ट (Police Driving Test) 01

पोलिस भरती चालक टेस्ट (Police Driving Test)
आगामी पोलीस भरती, आरोग्य विभाग भरती,जिल्हा परिषद भरती, व इतर TCS/IBPS पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व पदांच्या भरती साठी उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज  सुरू आहे

अधिक माहिती व डेमो पेपर साठी 9960713279 या व्हाट्सअप नंबर वर संपर्क करा.

मार्गदर्शक:-गोविंद गोरे
(जिजाऊ करीअर अकॅडमी)

1 / 18

शिकाऊ चालकाला कोण प्रशिक्षण देऊ शकतो.

1. मान्यता प्राप्त वाहन प्रशिक्षक

2. वाहन चालविण्याची अनुज्ञप्ती धारण करणारी व्यक्ती

3. शिकाऊ अनुज्ञप्ती धारण करणारी व्यक्ती

4. कुटुंबातील अनुभवी व्यक्ती

2 / 18

नोंदणी प्रमाणपत्र, परवाना इत्यादी शिवाय वापरण्यात येणारी वाहने अडवून ठेवण्याचा अधिकार पोलिस अधिकाऱ्यास कोणत्या कलमानुसार आहे.

1. कलम 207

2. कलम 209

3. कलम 211

4. कलम 213

3 / 18

कोणत्या चालकाला परवान्याची गरज नसते.

1. ट्रॅक्टर

2. रस्त्याचे बांधकाम व देखभाल करणाऱ्या वाहनाच्या

3. टायरची चाके असलेल्या रोड रोलरच्या

4. वरील सर्व

4 / 18

सार्वजनिक ठिकाणी वाहन चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने मोटार वाहन कायद्यातील कलम 185 खालील अपराध केलेला आहे असा वाजवी संशय असेल तर त्या वाहनचालकाच्या रक्तामधील अल्कोहोल तपासण्यासाठी श्वासाची चाचणी करण्याचा अधिकार पोलिस अधिकाऱ्यास कोणत्या कलमानुसार आहे.

1. कलम 203

2. कलम 204

3. कलम 207

4. कलम 209

5 / 18

वाहनचालकांनी बिल्ला कोठे लावावा.

1. गाडीवर मधोमध

2. छातीवर डाव्या बाजूस

3. गाडीवर उजव्या बाजूस

4. डोक्यावरच्या टोपीवर

6 / 18

दिलेले चिन्ह काय दर्शविते.
1. पुढे रोधक आहे

2. पुढे रेल्वे क्रॉस आहे

3. पुढे वजन काटा आहे

4. यापेक्षा वेगळे

7 / 18

जी वाहतूक चिन्हे त्रिकोणात असतात ती वाहन चालकास कोणता संदेश देणारी असतात.

1. बंधनकारक

2. सावधान करणारी

3. माहितीदर्शक

4. यापेक्षा वेगळे

8 / 18

वाहनातील सपाट आरशात कोणती प्रतिमा दिसते.

1. खरी प्रतिमा दिसते

2. खोटी प्रतिमा दिसते

3. मागील भाग विस्तृत दिसतो

4. वरील सर्व

9 / 18

आपण वाहनाचा हॉर्न केंव्हा वाजवला.

1. आपल्या अस्तित्वाची जाणीव इतर चालकांना करण्यासाठी

2. तुम्हाला अग्रक्रम मिळावा म्हणून

3. आंधळ्या वळणावर इतरांना सावध करण्यासाठी

4. सातत्याने

10 / 18

अल्कोहोलच्या सेवनाचा सर्वात जास्त प्रभाव कशावर पडतो.

1. दृष्टी

2. संतुलन

3. निर्णयक्षमता

4. कौशल्य

11 / 18

ड्रायव्हिंग लायसन्स केंव्हा जवळ बाळगणे आवश्यक आहे.

1. फक्त राजमार्गावरून वाहन चालविताना

2. जवळ बाळगण्याची गरज नाही

3. वाहन चालविताना नेहमी

4. कधी कधी

12 / 18

द्रुतगती रस्त्यावर आपले वाहन नादुरुस्त झाले आहे. अशावेळी इशारा देणारा त्रिकोण आपण कोठे प्रदर्शित कराल.

1. वाहनाच्या शेतावर

2. वाहनाला खेटुन मागे

3. वाहना मागे 50 मीटर अंतरावर

4. वाहनाच्या पुढे 100 मीटर अंतरावर

13 / 18

खालीलपैकी कोणते वाहने चालविताना अतिरिक्त खबरदारी घेतली पाहिजे.

1. L पाटी लावलेली वाहने

2. कमी वेगाने चालणारी वाहने

3. हलकी वाहने

4. जड वाहने

14 / 18

तुमच्या कारचा वेग ताशी 45 किमी असल्यास पुढील वाहनापासून तुमचे वाहन किती अंतरावर असावे

1. एका कारच्या लांबी इतके

2. दोन कारच्या लांबी इतके

3. तीन कारच्या लांबी इतके

4. पाच कारच्या लांबी इतके

15 / 18

अधिक वर्दळ असणाऱ्या वाहतुकीत आपण उजवीकडे वळण्याचा इशारा देत आपण कसे वळाल..

1. हॉर्न वाजवून

2. हाताने इशारा देऊन

3. हेडलाईट चमकवून

4. वाहन वेगाने चालवून

16 / 18

वाहनचालकांनी मनुष्यविरहित रेल्वे क्रॉसिंग ओलांडणे पूर्वी काय करावे.

1. रेल्वेची वाट न पाहता रेल्वेमार्ग ओलांडावा

2. हॉर्न वाजवून लवकरात लवकर रेल्वेमार्ग ओलांडावा

3. रेल्वे जाईपर्यंत वाट पहावी

4. रस्त्याच्या डाव्या बाजूस वाहन थांबवून रेल्वे येत नसल्याची खात्री करावी.

17 / 18

एखाद्या वाहनाला अपघात होऊन त्यातील व्यक्तीस दुखापत झाली असल्यास एक जबाबदार नागरिक म्हणून तुम्ही काय कराल.

1. दुखापतग्रस्तांना वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न करून जवळच्या पोलीस ठाण्यास 24 तासाच्या आत कळवावे

2. आपले वाहन थांबवून पोलिस ठाण्याला अपघाताबद्दल कळवाल

3. वाहनासह जवळच्या पोलिस ठाण्यात जाऊन अपघाताबद्दल कळवाल

4. अपघात झालेल्या व्यक्तीस तिथेच सोडून निघून जाल

18 / 18

खालीलपैकी कोठे हॉर्न वाजवण्यास मनाई आहे.

1. पोलीस स्टेशन जवळ

2. मशिद, चर्च आणि मंदिर जवळ

3. हॉस्पिटल, न्यायालयाच्या जवळ

4. वरील सर्व

Your score is

The average score is 45%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *