World Population Day 2024 : जागतिक लोकसंख्या दिन 2024

World Population Day 2024 : जागतिक लोकसंख्या दिन 2024

आज जागतिक लोकसंख्या दिन आहे. त्या निमित्ताने काही माहिती बघु.ज्या वेगाने लोकसंख्या वाढत आहे, ती त्याच प्रमाणे वाढत राहिली तर २०५० सालापर्यंत जगाची लोकसंख्या ९.७ अब्ज तर २०८० च्या दशकाच्या अर्ध्यात १०.४ अब्जावर गेलेली असेल, यूएनएफपीएच्या जागतिक लोकसंख्या अहवालानुसार, काही वर्षांपूर्वी जगामध्ये चीनची लोकसंख्या सर्वाधिक होती. मात्र, २०२३ मध्ये चीनला मागे टाकत १.४ अब्ज लोकसंख्येसह भारत पहिल्या क्रमांकावर आला आहे.

उद्देश :

जागतिक लोकसंख्या दिन हा साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये कुटुंबनियोजन, लिंगसमानता, दारिद्र्य, मातृस्वास्थ्य आणि मानव हक्कांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे

थोडक्यात पार्श्वभूमी :

१९८९ मध्ये UNO ने (World Population Day 2024) : जागतिक लोकसंख्या दिन 2024 या दिवसाची स्थापना केली. ११ जुलै १९८७ रोजी जगाची एकुण लोकसंख्या पाच अब्जांवर पोहोचली होती .याचा परिणाम स्वरूप डॉ. के. सी. झकारिया यांनी सुचविल्याप्रमाणे जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला.

2024 ची थीम :

संयुक्त राष्ट्राने World Population Day 2024 : जागतिक लोकसंख्या दिन 2024 या वर्षीची थीम पुढीलप्रमाणे ठरवली आहे :

“कोणालाही मागे न ठेवण्यासाठी प्रत्येकाची गणना करा (To leave no one behind, count everyone) “

महत्वाची माहिती :

World Population Day 2024 : जागतिक लोकसंख्या दिन 2024 या दिनानिमित्त काही माहिती दिली आहे जी की येणाऱ्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची माहिती आहे.

  • 1804 मध्ये जगाची लोकसंख्या केवळ 1 अब्ज (1 Billion) होती.
  • 1974 पर्यंत ती 4 अब्ज झाली.
  • 11 जुलै 1987 ला जगाने 5 अब्जांचा, 12 ऑक्टोबर 1999 ला 6 अब्जांचा,
  • 31 ऑक्टोबर 2011 ला 7 अब्जांचा आकडा पार पाडला.
  • 2025 मध्ये जग 8 अब्जांचा आकडा पार करेल.
  • 11 जुलै 1987 ला जगाने 5 अब्जांचा आकडा पार केल्यामुळे 1989 वर्षापासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ (World Population Day) म्हणून साजरा केला जातो.
  • हा दिन साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये कुटुंबनियोजन, लिंगसमानता, दारिद्र्य, मातृस्वास्थ्य आणि मानव हक्कांबाबत जागरुकता निर्माण करणे हा आहे.

“MPSC Combine संयुक्त पुर्व परिक्षा इतिहास PYQ सराव पेपर “

START TEST

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *