चालु घडामोडी 2024 | Current affairs in Marathi

चालू घडामोडी | Current Affairs In Marathi | Chalu Ghadamodi 2024

त्यासाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस ची गरज असते आणि जर ही प्रॅक्टिस प्रश्न स्वरूपात केली तर त्या गोष्टी आपण विसरत नाहीत आणि त्याचा येणाऱ्या परीक्षेमध्ये आपल्याला पुरेपूर फायदा होतो .चला तर मग सुरू करूया 

चालु घडामोडी 2024 | Current affairs in Marathi

Current Affairs Free Online Mock Test 2024

ऑगस्ट 2024

चालु घडामोडी 1 ते 5 ऑगस्ट 2024

1) महाराष्ट्र सरकारने मातंग व गारुडी समाजाच्या कल्याणासाठी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे?

उत्तर : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था

स्पष्टीकरण : राज्य सरकारने आदेश काढून अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापना केली.या संस्थेमार्फत मातंग, गारुडी, मिनिमादिग, दखनी-मांग, मांग म्हशी, मदारी, राधेमांग, मांग-गारोडी, मांग-गारुडी, मादगी, मदिगा या समाजाच्या कल्याणासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत

आर्टी’ची ठळक उद्दिष्टे :

अशीसामाजिक समतेच्या प्रक्रियेत मातंग समाजाला सामावून घेण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे. संस्थेचे समाज उन्नतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी याच पद्धतीने कार्यरत संस्थांचे सहकार्य घेणे. अशा संस्थांना प्रोत्साहन देणे. लोकगीते, लोकसंस्कृती, लोककला संशोधन यांचे प्रशिक्षण, प्रचार, प्रसिद्धी देणे

2) न्या. एन कोटीश्वर सिंह हे कोणत्या राज्याचे सर्वोच्च न्यायालयात नियुक्त झालेले पहिले न्यायाधीश ठरले आहेत?

उत्तर : मणिपूर

स्पष्टीकरण : केंद्राने जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती एन कोटीश्वर सिंग अन् मद्रास उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली.

न्यायमूर्ती सिंग हे मणिपूरचे पहिले एससी न्यायाधीश आहेत.

चालु घडामोडी 2024 | Current affairs in Marathi

3) गूजरात राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे.

स्पष्टीकरण : गुजरातमधील भावनगर जिल्ह्याजवळ ५५ किलोमीटर अंतरावरील पालिताना हे शहर आता जगातील पहिले शाकाहारी शहर म्हणून घोषित झाले आहे. या शहरात मांस खाण्यावर आणि खरेदी-विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हे मांसाहार बंदी असलेले शहरदेखील ठरले आहे.

4)मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहरात एका दिवसात अकरा लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे.

स्पष्टीकरण : गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांनी मध्य प्रदेश सरकारला जारी केलेले प्रमाणपत्र मुख्यमंत्री मोहन यादव यांच्याकडे देण्यात आले.

मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहरात २४ तासात 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे.

5)आंतरराष्ट्रीय न्याय दिन 17 जुलै रोजी साजरा करण्यात येतो.

स्पष्टीकरण: 17 जुलै रोजी जगभरात साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय दिवस आहे . 17 जुलै ही संधि स्वीकारण्याची तारीख आहे ज्याने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाची स्थापना केली . 1 जून 2010 रोजी, कंपाला ( युगांडा ) येथे आयोजित रोम कायद्याच्या पुनरावलोकन परिषदेत , राज्य पक्षांच्या असेंब्लीने 17 जुलै हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्याय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला

6)भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोची ठिकाणच्या शिपयार्ड येथे बांधले आहे.

स्पष्टीकरण : देशातील जलपर्यटनाला चालना देणारा एक नवा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.१५ ऑगस्टपासून पर्यटकांसाठी सुरू होणार, कुंभमेळ्यातही वापर करण्यात येईल.तसेच जहाज कुंभमेळ्यादरम्यान काशी ते प्रयागराज दरम्यान चालवण्याची योजना आहे.

जहाजाची वैशिष्ट्ये:

पर्याय म्हणून इलेक्ट्रिक इंजिनची व्यवस्था.

इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराने वायूप्रदूषणमुक्त पर्यटनाला चालना मिळणार.

कोची शिपयार्डमध्ये बांधणी.

जहाजासाठी बनारस टर्मिनलवर ५०० किलो वजनाचा हायड्रोजन निर्मिती क्षमतेचा प्रकल्प लवकरच उभारणार.

7) मानस हेल्पलाइन ची सुरुवात.

स्पष्टीकरण : या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ईमेलसह लॉन्च केले जाईल.ज्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांबद्दल आणि संबंधित समस्यांबद्दल NCB ला माहिती देण्याची परवानगी मिळेल.

MANAS म्हणजेच ‘मडक पदार्थ निसेध असुचना केंद्र’ किंवा अंमली पदार्थ प्रतिबंधक गुप्तचर केंद्र.

उद्दिष्ट : प्रत्येक नागरिकासाठी 24×7 औषधांशी संबंधित बाबींची सोयीस्करपणे तक्रार करण्यासाठी वापरकर्ता- अनुकूल प्लॅटफॉर्म स्थापित करणे आहे.अंमली पदार्थांशी संबंधित अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे विशेष पोर्टल आहे

टोल-फ्री क्रमांक 1933 आणि ईमेलसह info.ncbmanas@gov.in.

8) पॉल कागामे यांची रवांडा देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाली आहे.

स्पष्टिकरण : रवांडा बद्दल माहिती :

रवांडा हा पूर्व मध्य आफ्रिकेतील भूपरिवेष्टित देश आहे. हा देश हजार डोंगरांचा देश म्हणूनही ओळखला जातो .रवांडा हा उप-सहारा आफ्रिकन प्रदेशाचा भाग आहे

.राजधानी: किगाली

चलन: रवांडन फ्रँक

अध्यक्ष: पॉल कागामे

चालु घडामोडी 2024 | Current affairs in Marathi

9) हंस वॉन हेटिंग पुरस्कार २०२४ ने के. चोकलिंगम या भारतीय व्यक्तीला सन्मानित करण्यात आले आहे

स्पष्टीकरण : स्थापना : वॉन हेनटिग पुरस्कार चे नाम प्रसिद्ध जर्मन अपराधशास्त्री हंस वॉन हेनटिग यांच्या नावावरून ठेवले. हा पुरस्कार पीड़ित विज्ञान आणि आपाधीक न्यायाच्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला उ.

दररोज पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी Join करा Teligram Channel 👇

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठीयेथे क्लिक करा…पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)

Join Teligram Channel  (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…

नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा
पोलिस भरती चालक टेस्ट सिरीज मोफत दररोज सोडवण्यासाठी Click करा
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs) Police Bharti Chalu Ghadamodi 2024
पोलिस भरती संभाव्य चालू घडामोडी टेस्ट (police bharti current affairs)  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *