
आगामी MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा हाॅलतिकीट (25 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या) परीक्षेसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग हाॅलतिकीट जारी करणार आहे , ज्याला सामान्यतः MPSC म्हणून ओळखले जाते . ही परीक्षा महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची आहे, कारण हजारो युवकांना /उमेदवारांना अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करते.हे मूलक समोर जाऊन महाराष्ट्राच्या आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ती भुमिका घेतात.
MPSC ने या भरतीसाठी 274 रिक्त जागा जाहीर केल्या होत्या आणि प्राथमिक पूर्व परीक्षा 25 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे. ज्या यूवकांनी उमेदवारांनी 05 ते 24 जानेवारी 2024 मध्ये परीक्षेसाठी फाॅम भरला होता ते आता अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षांची हाॅलतिकीट पूर्व परीक्षा प्रवेशपत्र किंवा राज्यसेवा हॉल तिकीट परीक्षेच्या साधारणत: किमान 07 दिवस आधी उपलब्ध केली जातात. तूम्हाला हाॅलतिकीट लिंक या पोस्टच्या शेवटी मिळुन जाईल.जेथून तुम्ही लॉग इन करून लगेच आणि हाॅलतिकीट डाउनलोड करू शकता.
MPSCE परीक्षा प्रवेशपत्र 2024
परीक्षेचे नाव | महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त प्राथमिक परीक्षा 2024 |
प्राधिकरण | MPSC |
एकुण जागा | २७४ |
पुर्व परीक्षेची तारीख | 25 ऑगस्ट 2024 |
हॉल तिकीट | देण्यात येणार आहे |
अधिकृत वेबसाइट | mpsc.gov.in |
महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षा 2024 ची अर्ज प्रक्रिया 05 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 पर्यंत होती.मित्रांनो वेळ खुप कमी आहे.आणि महत्त्वाच म्हणजे पुढच्या वर्षी ह्या पॅटर्न नुसार परिक्षा नसतील म्हणून जोरदार तयारी सुरू करा.
टेलीग्राम ग्रुपआता सामील व्हा
निवड प्रक्रिया कशी असते
- महत्वाची 3 टप्पे असतात.
- प्राथमिक पुर्व परीक्षा: हा पहिला आणि खुप महत्वाचा टप्पा आहे आणि चाळणी परीक्षा म्हणूनही हा टप्पा काम करतो. ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा आहे .जी उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाचे आणि योग्यतेचे मूल्यांकन करते.
- मुख्य परीक्षा: जे उमेदवार पहिल्या टप्प्यात उत्तीर्ण झाले आहेत ते मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतात, या टप्प्याचा आवाका तसा खुप मोठा आहे पण योग्य नियोजन करून व झालेल्या प्रश्नपत्रिकांची चक्र केली तर नेमका काय अभ्यास करायचा हे समजते.
- वैयक्तिक मुलाखत: हा अंतिम टप्पा म्हणजेच Interview /मूलाखत.येथे तुमच्या योग्यतेचे, व्यक्तीमत्वाचे मूल्यमापन केले जाते
या सर्व टप्प्यांमधून पास झालेल्या उमेदवारांना प्रशासकीय सेवेत सामावून घेतले जाते.
पूर्व परीक्षेची माहिती
महाराष्ट्र राज्य सेवांच्या प्राथमिक लेखी परीक्षेत दोन पेपर असतील:
- पेपर I: सामान्य अध्ययन (GS)
- गुण: 200
- कालावधी: 2 तास
- प्रश्न: चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान यासारख्या विषयांचे वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न.
- पेपर II: नागरी सेवा अभियोग्यता चाचणी (CSAT)
- गुण: 200
- कालावधी: 2 तास
- प्रश्न: आकलन, तार्किक तर्क, विश्लेषणात्मक क्षमता, निर्णय घेण्याची आणि समस्या सोडवणे यावर लक्ष केंद्रित करणारे वस्तुनिष्ठ-प्रकारचे प्रश्न.
दोन्ही पेपर अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी प्रत्येकामध्ये कटऑफ गुणांपेक्षा जास्त गुण मिळवणे गरजेचे आहे.
एमपीएससी पुर्व हाॅलतिकीटाबद्दल माहिती
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षांची हाॅलतिकीट परीक्षा दयायची तर उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर हाॅलतिकीट नेले पाहिजे.यात उमेदवाराचे नाव, रोल नंबर, छायाचित्र, परीक्षेची तारीख, वेळ आणि ठिकाण यासारखी आवश्यक माहिती असते. याव्यतिरिक्त, उमेदवारांनी आपल्या आधार कार्डच्या 2 झेरॉक्स प्रती न्यायला हव्यात
एमपीएससी प्रिलिम्स हॉल तिकीट कसे डाउनलोड करावे?
1. मुख्यपृष्ठावरील “Important Notice” किंवा “Latest Updates” वर जा.
2. “Announced Regarding To Download the MPSC Prelims Hall Ticket 2024” लिंक शोधा.
3. त्या लिंकवर क्लिक करा, उमेदवार हॉल तिकीट डाउनलोड पृष्ठ दिसेल.
- अधिकृत वेबसाइटला वर जा: mpsc.gov.in यानंतर .
- हॉल तिकीट विभागात जा. होमपेजवर “MPSC राज्यसेवा परीक्षा 2024 हॉल तिकीट” अशी लिंक असेल.
- त्या लिंक वर क्लिक करा: क्लिक केल्यास नवीन page वर नेले जाईल जेथे तुम्हाला तुमचे लॉगिन माहिती टाकणे गरजेचे आहे.
- लॉग इन करण्यासाठी तुमचा नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड/जन्मतारीख द्या.
- लॉग इन केल्यानंतर तुमचे हॉल तिकीट स्क्रीनवर दिसेल. ते डाउनलोड करा आणि प्रिंट काढून घ्या.
- हॉल तिकिटावरील सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करा. काही विसंगती आढळल्यास ताबडतोब आयोगाशी संपर्क साधा.