आजच्या चालू घडामोडी वरील Current affairs सोडवण्या साठी पुढे लिंक दिली आहे ती |(Current affairs In Marathi) दररोज दिली जाते.Current Affairs In Marathi चे प्रश्न दररोज च्या चालू घडामोडी वर आधारित असतील .तसेच आगामी पोलिस भरती पॅटर्ननूसार टेस्ट सिरीज सोडविण्यासाठी Offer फक्त 99 रूपयात 1 वर्षे होईपर्यंत दररोज 100 गूणांचा पेपर मिळवण्यासाठी तसेच टेस्ट सिरीज Join करायची असेल तर असेल संपर्क साधावा.

💁♂आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या करिता पोलीस भरती व सरळ सेवेसाठी उपयुक्त अशी ऑनलाइन टेस्ट सिरीज.
💠 झालेले सर्व पेपर सोडवू शकता
⏹खाली दिलेल्या लिंक वरून डेमो पेपर सोडवून बघा.
👉 टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी 9960713279 या नंबर वर संपर्क करा.
Police bharti Current affairs | Current affairs In Marathi| Chalu Ghadamodi 2025
🗓 29 डिसेंबर 2025 : चालू घडामोडी प्रश्नोत्तरे*✍️✍️
अलीकडेच आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला ?
A.१२ मे
B.५ डिसेंबर
C.३० जानेवारी
D.२७ डिसेंबर
➠ २७ डिसेंबर
अलीकडेच, 27 डिसेंबर 2024 रोजी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन (International Day of Epidemic Preparedness) साजरा करण्यात आला, जो दरवर्षी याच दिवशी साजरा होतो, आणि याचा मुख्य उद्देश साथीच्या रोगांना प्रतिबंध, तयारी आणि सहकार्याचे महत्त्व वाढवणे आहे. हा दिवस पहिल्यांदा 27 डिसेंबर 2020 रोजी साजरा झाला, जेव्हा संयुक्त राष्ट्र महासभेने याला मान्यता दिली. मुख्य मुद्दे:कधी: दरवर्षी 27 डिसेंबर रोजी.उद्देश: महामारी प्रतिबंध, लवकर ओळख आणि प्रभावी प्रतिसादासाठी आरोग्य प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्याची गरज अधोरेखित करणे.सुरुवात: 27 डिसेंबर 2020 रोजी पहिल्यांदा साजरा झाला.आयोजक: संयुक्त राष्ट्र (United Nations) आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांसारख्या संस्था याला पाठिंबा देतात.
छतावरील सौरऊर्जेच्या बाबतीत कोणते राज्य अलीकडेच आघाडीचे राज्य म्हणून उदयास आले आहे ?
A.महाराष्ट्र
B.दिल्ली
C.गूजरात
D.तामिळनाडू
➠ गुजरात
अलीकडे, गुजरात हे राज्य छतावरील सौरऊर्जेच्या बाबतीत आघाडीवर उदयास आले आहे, कारण ते मजबूत धोरणे आणि निवासी वापरासाठी असलेल्या PM Surya Ghar Muft Bijli Yojana मध्ये सक्रिय सहभागामुळे देशातील एकूण छतावरील सौर क्षमतेमध्ये 25% वाटा उचलत आहे, जरी राजस्थान एकूण सौर क्षमतेमध्ये अव्वल आहे.
भारतातील पहिला स्वदेशी एमआरआय स्कॅनर अलीकडेच कोणाच्या सहकार्याने विकसित करण्यात आला ?
A.Meta
B.Google
C.Zoho
D.Flipcart
➠ Zoho
भारतातील पहिले स्वदेशी एमआरआय स्कॅनर व्हॉक्सलग्रिड्स (Voxelgrids) या झोहो-समर्थित स्टार्टअपने विकसित केले आहे, ज्यामध्ये झोहो (Zoho) आणि भारत सरकार यांचा मोठा सहभाग आहे, जेणेकरून हे स्वस्त आणि हलके मशीन देशभरात, विशेषतः ग्रामीण भागात उपलब्ध होईल आणि आरोग्यसेवेमध्ये आत्मनिर्भरता येईल. मुख्य मुद्दे:विकसक: व्हॉक्सलग्रिड्स (Voxelgrids).सहयोगी: झोहो (Zoho) आणि भारत सरकार (Government of India).वैशिष्ट्ये: हे मशीन द्रवरूप हेलियम वापरत नाही, त्यामुळे ते पारंपरिक मशीनपेक्षा अंदाजे ४०% स्वस्त आहे आणि वजनाने हलके आहे.स्थान: हे स्कॅनर सध्या चंद्रपूर, महाराष्ट्रातील एका कर्करोग केंद्रात कार्यरत आहे.उद्देश: स्वदेशी तंत्रज्ञानाने परवडणाऱ्या आरोग्यसेवेला प्रोत्साहन देणे आणि ‘मेड इन इंडिया’ उपक्रमाला चालना देणे.
खोल समुद्रतळातून दुर्मिळ खनिजयुक्त मातीचे उत्खनन करण्याची चाचणी करण्याची योजना अलीकडेच कोणी जाहीर केली ?
A.चीन
B.जपान
C.अमेरिका
D.रशिया
➠ जपान
जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे नुकतेच उद्घाटन कुठे करण्यात आले ?
A.चीन
B.जपान
C.अमेरिका
D.रशिया
➠ चीन
जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगद्याचे उद्घाटन , चीनने अलीकडेच तियानशान शेंगली बोगदा पूर्ण केला आहे, जो जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा आहे. तसेच, जून २०२५ मध्ये समृद्धी महामार्गाच्या (मुंबई-नागपूर) शेवटच्या टप्प्याचे उद्घाटन झाले, ज्यात भारतातील सर्वात लांब स्मार्ट बोगदा समाविष्ट आहे, पण हा जगातील सर्वात लांब नाही. नवीन आणि महत्त्वाचे बोगदे (अलीकडील)तियानशान शेंगली बोगदा (Tianshan Shengli Tunnel): चीनमध्ये बांधलेला, हा जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा आहे, ज्याचे बांधकाम नुकतेच पूर्ण झाले आहे (जानेवारी २०२५ पर्यंत).सेला बोगदा (Sela Tunnel): अरुणाचल प्रदेश, भारत येथे आहे, जो जगातील सर्वात लांब द्वि-लेन बोगदा आहे आणि मार्च २०२४ मध्ये उद्घाटनानंतर कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.
कोणत्या देशाने अलीकडेच एका नवीन लांब पल्ल्याच्या विमानविरोधी/ICBM-सक्षम क्षेपणास्त्राची चाचणी घेतली ?
A.इराण
B.उत्तर कोरिया
C.दक्षिण कोरिया
D.पाकिस्तान
➠ उत्तर कोरिया
बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन (BWF) अॅथलीट्स कमिशनच्या अध्यक्षपदी अलीकडेच कोणाची निवड झाली आहे ?
A.पी.व्ही. सिंधू
B.सायना नेहवाल
C.चिराग शेट्टी
D.लक्ष सेन
➠ पी.व्ही. सिंधू
रिओ 2016 ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक आणि टोकियो 2020 मध्ये कांस्यपदक जिंकणारी पी. व्ही. सिंधू ही आजपर्यंतची भारताची सर्वांत यशस्वी बॅडमिंटन खेळाडू आहे. ही 30 वर्षीय शटलर चीनमधील किंगदाओ येथे होणाऱ्या 2026 बॅडमिंटन आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताचे नेतृत्व करणार आहे. युरोपियन गेम्समधील महिला दुहेरीची रौप्यपदक विजेती नेदरलँड्सची डेबोरा जिल या आयोगाची उपाध्यक्ष म्हणून काम करेल. आयोगावरील इतर खेळाडू प्रतिनिधींमध्ये सध्याची ऑलिम्पिक महिला एकेरी विजेती दक्षिण कोरियाची आन से-यंग, सहा वेळा आफ्रिकन गेम्समध्ये पदक विजेती राहिलेली इजिप्तची दोहा हानी आणि पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील महिला दुहेरीची सुवर्णपदक विजेती चीनची जिया यिफान यांचा समावेश आहे.
संशोधनाला चालना देण्यासाठी कोणत्या आयआयटीने अलीकडेच सुपरकॉम्प्युटर लाँच केला आहे ?
A.आयआयटी खरगपूर
B.आयआयटी कानपुर
C.आयआयटी मद्रास
D.आयआयटी पटना
➠ आयआयटी पटना
नुकतेच पार पडलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन स्पर्धेत तिलोत्तमा सेनने कोणते पदक जिंकले ?
A.कास्य
B.रौप्य
C.सूवर्ण
D.एकही नाही
➠ सुवर्ण
नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत, तिलोत्तमा सेनने महिलांच्या ५० मीटर रायफल ३ पोझिशन (3P) स्पर्धेत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) जिंकले आहे. तिने ४६६.९ गुणांसह हे यश मिळवले, ज्यामुळे ती देशासाठी पॅरिस ऑलिंपिक कोटा मिळवणारी सर्वात कमी वयाची भारतीय खेळाडू ठरली. पदक: सुवर्ण (Gold)स्पर्धा: महिलांची ५० मीटर रायफल ३ पोझिशनठिकाण: भोपाळ
२०२६ साठी किम्बर्ली प्रक्रियेचे अध्यक्ष म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
A.अमेरिका
B.रशिया
C.जपान
D.भारत
➠ भारत
किंबर्ले प्रोसेस’ च्या (KP – जगभरातील कच्च्या हिऱ्यांचा व्यापार सुरक्षित व पारदर्शक बनवण्यासाठीची जागतिक आंतरराष्ट्रीय यंत्रणा) आमसभेत, या यंत्रणेच्या अध्यक्षपदासाठी भारताची निवड झाली आहे. येत्या 1 जानेवारी 2026 पासून या भारत या अध्यक्षपदाचा कार्यभार स्विकारेल. किंबर्ले प्रोसेस हा जगभरातील देश, आंतरराष्ट्रीय हिरे उद्योग व नागरी समुदायांचा एक त्रिपक्षीय उपक्रम आहे. संघर्षाला पाठबळ पुरवण्यासाठी होणाऱ्या हिऱ्यांच्या अनैतिक व्यापाराला अर्थात कॉन्फ्लीक्ट डायमंड्सला (conflict diamonds) प्रतिबंध करणे, हा यामागचा उद्देश आहे. याबाबत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेने केलेल्या वाख्येनुसार बंडखोरांचे गट किंवा त्यांच्या मित्रपक्षांनी वैध सरकारांना अस्थिर करण्यासाठी व संघर्षांना वित्तपुरवठा करण्यासाठी वापरात आणलेल्या कच्च्या स्वरुपातील हिऱ्यांना conflict diamonds असे म्हटले जाते.नव्या वर्षात या यंत्रणेचे अध्यपद स्वीकारण्याआधी, भारत 25 डिसेंबर 2025 पासून किंबर्ले प्रोसेसचे उपाध्यक्षपद स्वीकारणार आहे. भारताला तिसऱ्यांदा किंबर्ले प्रोसेसच्या अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. या यंत्रणेच्या अध्यक्षपदासाठी भारताची झालेल्या निवडीतून, आंतरराष्ट्रीय व्यापारात सचोटी आणि पारदर्शकतेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने व्यक्त केलेल्या वचनबद्धतेवरचा जागतिक विश्वास दिसून येतो असे त्यांनी म्हटले आहे.किंबर्ले प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) ची स्थापना संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार झाली होती व 1 जानेवारी 2003 पासून ती प्रत्यक्षात अमलात आली होती. आपल्या स्थापनेपासून आत्तापर्यंत ही यंत्रणा conflict diamonds च्या व्यापारावर नियंत्रण ठेवणारी एक प्रभावी यंत्रणा म्हणून विकसित झाली आहे. किंबर्ले प्रोसेसचे सध्या 60 सहभागी सदस्य आहेत. याअंतर्गत युरोपियन महासंघ (EU) आणि त्यातील सदस्य राष्ट्रांना एकच सदस्य मानले गेले आहे. किंबर्ले प्रोसेसचे सहभागी सदस्य असलेल्या सर्व देशांचा जागतिक कच्च्या हिऱ्यांच्या व्यापारात 99 टक्क्यांपेक्षा जास्त वाटा आहे. यामुळेच ही यंत्रणा या क्षेत्रावर नियंत्रण असलेली सर्वात व्यापक आंतरराष्ट्रीय यंत्रणा ठरली आहे.आज भारत हिरे उत्पादन व व्यापाराचे एक प्रमुख जागतिक केंद्र आहे. सध्याची बदलती भू-राजकीय स्थिती तसेच शाश्वत व उत्तरदायी स्रोतांवर वाढता भर दिला जात असल्याच्या काळात भारताकडे या यंत्रणेच्या अध्यक्षपदाची जाबाबदीरी आली आहे. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात भारत प्रशासन व अनुपालनाला बळकटी देणे, डिजिटल प्रमाणन तसेच माग काढण्याची क्षमतेला प्रगत स्वरुप देणे, माहितीवर आधारित देखरेखीच्या माध्यमातून पारदर्शकतेच्या व्याप्तीचा विस्तार करणे, conflict diamonds मुक्त हिऱ्यांबाबत ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यावर भर देणार आहे.2025 मध्ये उपाध्यक्ष व 2026 मध्ये अध्यक्ष म्हणून भारत किंबर्ले प्रोसेसमधील सर्व सहभागी तसेच निरीक्षकांना सोबत घेऊन काम करेल. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात या यंत्रणेबद्दलचा विश्वास दृढ करणे, नियमांवर आधारित अनुपालनाची खात्री करणे व त्याबद्दलची विश्वासार्हता सुधारणे, तसेच किंबर्ले प्रोसेसला अधिक समावेशक तसेच प्रभावी बहुपक्षीय आराखडा बनवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
ही माहिती उपयुक्त वाटली तर शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या अपडेट्ससाठी परत या.
मराठी सराव पेपर TEST लिंक : START
टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा आणि आवडल्या असतील तर आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा.
दररोज पोलिस भरती मोफत संभाव्य चालू घडामोडी टेस्ट सिरीज सोडवण्यासाठी JOIN करा
TELIGRAM CHANNEL 👇
Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…
Join WhatsApp Group (चालू घडामोडी वरील दररोज टेस्ट साठी)येथे क्लिक करा…
नाद स्वतःच्या स्वाभिमानाचा

