Marathi Grammar Questions Test 13 (मराठी व्याकरण सराव पेपर क्र.13)

Marathi Grammar Test
आजची टेस्ट कशी वाटली ते नक्की Comments करून कळवा तसेच आपल्या मित्रांना शेअर करा आणि पेज बुकमार्क करा! उद्याच्या टेस्ट साठी/अपडेट्ससाठी परत या.

मराठी च्या सर्व सराव टेस्ट पेपर्स सोडवण्यासाठी [CLICK] करा.

0%
40
Marathi Grammar Test

मराठी सराव पेपर क्र.14

पोलीस भरती,तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती, ग्रामसेवक भरती, कृषीसेवक भरती, आरोग्यसेवक भरती आणि सर्व महा भरती - मेगा भरतीसाठी उपयुक्त प्रश्नसंच

1 / 25

संकेतदर्शक वाक्यातून कोणता काळ दर्शविला जातो?

A.साधा भविष्यकाळ
B.चालू वर्तमानकाळ
C.साधा वर्तमानकाळ
D.साधा भूतकाळ

2 / 25

मृदू व्यंजन ओळखा.

A.फ्
B.च्
C.ढ्
D.त्

3 / 25

गुंतागुंत’ हा शब्द कोणत्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे?

A.उपहास
B.उगीच
C.उकल
D.उन्नत

4 / 25

उत्कृष्ट दर्जाची वस्तू आणि योग्य सेवा हे दोन व्यवसायातील महत्त्वाचे पैलू आहेत. – उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

A.परिणाम बोधक
B.न्यूनत्वबोधक
C.विकल्पबोधक
D समुच्चयबोधक

5 / 25

सर्वनामांपासून बनलेल्या विशेषणांना ___म्हणतात.

A.दोन्हीही
B.सर्वनामसाधित विशेषणे
C.सार्वनामिक विशेषण
D.एकही नाही

6 / 25

खालीलपैकी दंत्य वर्ण कोणता नाही ते ओळखा

A.च्
B.त्
C.ल्
D.द्

7 / 25

तैल हा शब्द ….. शब्द आहे

A.देशी
B.तत्सम
C.तद्भव
D.विदेशी

8 / 25

पूर्ण वर्तमानकाळाचे निवडा

A.आई गावाला जात आहे.
B.मी निबंध लिहीत असे.
C.साक्षी नृत्य शिकली आहे.
D आरती गाणे गाते.

9 / 25

वाक्यातील कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेव्हा …….. हा अलंकार होतो.

A.रूपक
B.दृष्टांत
C.व्याजस्तुती
D.सार

10 / 25

खालीलपैकी ‘स्वर संधी’ चे उदाहरण कोणते आहे?

A.नमस्कार
B.अनाथाश्रम
C.विपत्काल
D.उल्लेख

11 / 25

पांढऱ्या रंगाचा शर्ट तुला शोभून दिसतो या वाक्यातील उद्देश्य काय आहे?

A.पांढऱ्या
B.रंगाचा
C.शर्ट
D.शोभून

12 / 25

खालीलपैकी पुल्लिंगी शब्द निवडा

A.फळ
B.इमारत
C.घर
D.भात

13 / 25

बहिणभाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता ?

A.बहीणीचा भाऊ
B.बहिण व भाऊ
C.बहिणीसाठी भाऊ
D.एक बहीण एक भाऊ

14 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दाचे एकवचन आणि अनेकवचन सारखे नाही?

A.रस्ता
B.साप
C.देव
D.गहू

15 / 25

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
भावनेचा बांध फुटणे

A.खोटी शक्ती दाखवणे
B.भांबावून जाणे
C.परिस्थितीची जाणीव होणे
D.दाबून ठेवलेली भावना उफाळून येणे

16 / 25

'किरण’ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता?

A.खंक
B.धरणीधर
C.उत्कर्ष
D.रश्मी

17 / 25

जे क्रियापद सकर्मक आणि अकर्मक अशा दोन्ही प्रकारे वापरले जाते. त्या क्रियापदाला ….. क्रियापद म्हणतात.

A.द्वीकर्मक
B.उभयविध
C.संयुक्त
D.साधित

18 / 25

रस्त्याच्या दुतर्फा गुलाबाचा—-आकर्षक दिसत होता

A.गुच्छ
B.समूह
C.जाळी
D.ताटवा

19 / 25

बेडकाचे डरावणे तसे गाढवाचे_____

A.आरवणे
B.ओरडणे
C.हंबरने
D.किंचाळणे

20 / 25

खालील पर्यायातून शुध्द शब्द निवडा

A.नूतनीकरन
B.नूतनीकरण
C.नूतणीकरण
D.नुतनीकरण

21 / 25

रीतीवर्तमान काळात असणारे वाक्य शोधा

A.मी अभ्यास करत असे
B.मी अभ्यास करत असते
C.मी अभ्यास केला आहे
D.मी अभ्यास केला आहे

22 / 25

न थांबता केलेल्या कामामुळे हे घर पाच दिवसात उभे राहिले – या वाक्याचे मिश्र वाक्यात रुपांतर करा

23 / 25

सिद्धापुरवाडी गावात नाचणीचे पीक घेतले जाते – या वाक्यात एकूण किती विशेषनाम आहेत?

A.पाच
B.एकही नाही
C.तीन
D.दोन

24 / 25

. …. ! असे जेवते का कोणी!
योग्य केवलप्रयोगी अव्यय निवडून वाक्य पूर्ण करा

A.ए
B.शी
C.छे
D.अरे

25 / 25

बाबांनी मुलाला आर्शिवाद दिला – प्रयोग ओळखा

A.सकर्मक कर्तरी
B.अकर्मक कर्तरी
C.सकर्मक भावे
D.अकर्मक भावे

Your score is

The average score is 53%

0%

Join Teligram Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

Join WhatsApp Channel चालू घडामोडी टेस्ट आणि इतर सर्व महत्त्वाच्या अपडेट्स साठी येथे क्लिक करा…

आजची चालू घडामोडी वरील टेस्ट सोडविण्यासाठी Click करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *