NMMS : इतिहास सराव पेपर भाग :2 | NMMS Question Paper Test series 2025-26

इतिहास PYQ सराव पेपर

NMMS परीक्षेला सामोरे जातांना जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागतो.त्यात महत्वाचे म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे.

पेपर सोडवून झाल्यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिले आहे.

0%
34
इतिहास PYQ सराव पेपर

इतिहास PYQ सराव पेपर भाग : 2

आजचा सराव पेपर सोडवण्यासाठी खालील START बटणावर क्लिक करा 👇👇👇👇

1 / 25

कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते?(2021-22)

(1) मल्हारराव होळकर

(2) परसोजी भोसले
(3) नाना फडणवीस

(4) महादजी शिंदे

2 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला?(2021-22)

(1) लोकमान्य टिळक

(2) रविंद्रनाथ टागोर

(3) महात्मा ज्योतीराव फुले

(4) पितामह सुब्रमण्यम भारती

3 / 25

युरोपिय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले होते ?(2021-22)

(1) 15 वे शतक

(2) 16 वे शतक

(3) 17 वे शतक

(4)18 वे शतक

4 / 25

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे हे कोणत्या समाजाचे सदस्य होते?(2021-22)

(1) आर्य समाज

(2) सत्यशोधक समाज

(3) प्रार्थना समाज

(4) ब्राम्हो समाज

5 / 25

शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुख पदी नामवंत व्यक्तीची निवड केली होती. त्यामधील चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा.
(2021-22)
(1) बहिर्जी नाईक - हेर खाते
(2) मोरेश्वर पंडीतराव - न्यायाधीश
(3) दौलतखान - आरमाराचे प्रमुख अधिकारी
(4) हंबीरराव मोहिते - घोडदळाचे सरनोबत

6 / 25

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव यांनी मुंबई महापालिकेत मांडला.(2021-22)

(1) आचार्य अत्रे

(2) सेनापती बापट

(3) शंकरराव देव

(4) एस. एम. जोशी

7 / 25

'सोमवंशीय मित्र' हे मासिक कोणी सुरू केले?(2021-22)

(1) गोपाळबाबा वलंगकर

(2) महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

(3) पेरियार रामस्वामी नायकर

(4) शिवराम जानबा कांबळे

8 / 25

'लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे' हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश होता?(2021-22)

(1) भारत सेवक समाज

(2) प्रार्थना समाज

(3) आर्य समाज

(4) सत्यशोधक समाज

9 / 25

Question

10 / 25

पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा.(2021-22)

1) प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाळून मुंबईत स्वागत

II) जालियनवाला बाग हत्याकांड

III) असहकार चळवळ स्थगित

IV) राष्ट्रीय सभेअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना

(1) II, I, III, IV

(3) II, III, IV, I

(2) III, II, IV, I

(4) 1, III, IV, II

11 / 25

मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तिच्या इतिहासाविषयी माहिती मिळते ?(2021-22)

(1) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

(2) महात्मा ज्योतीराव फुले

(3) लोकमान्य टिळक

(4) महात्मा गांधी

12 / 25

गोपाळ हरि देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे?(2022-23)

(1) प्रभाकर

(3) जनता

(2) निबंधमाला

(4) ज्ञानोदय

13 / 25

'सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टिम' हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरले.
(2022-23)
(1) खंडेराव दाभाडे

(3) नेमाजी शिंदे

(2) धनाजी जाधव

(4) महाराणी ताराबाई

14 / 25

अफजलखानाच्या पारिपत्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील कोणते किल्ले जिंकून घेतले ते खाली दिले आहेत.
त्यामधील चुकीचा पर्याय लिहा.(2023-24)

(1) वसंतगड

(2) भूदरगड

(3) पन्हाळा

(4) खेळणा

15 / 25

महात्मा गांधीजीना अभिप्रेत असलेल्या सत्याग्रहाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट्ये नाही?(2022-23)

(1) सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे,

(2) अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे.

(3) अहिंसेच्या मागनि सत्य व न्याय याची जाणीव करुन देणे.

(4) हिंसा व असत्याचा वापराने न्याय मिळविणे.

16 / 25

खालील घटना कालानुक्रमे लिहा.(2023-24)

(अ) पूणे करार

(ब) पेशावरचा सत्याग्रह

(क) दुसरी गोलमेज परिषद

(ड) क्रिप्स योजना

पर्याय :

(1) अ, ब, क आणि ड

(2) ब, क, अ आणि ड

(3) क, ब, अ आणि ड

(4) क, ड, अ आणि ब

17 / 25

खालील घटना कालानुक्रमे लिहा.(2022-23)

(अ) सतीबंदिचा कायदा

(ब) रेग्युलेटिंग अॅक्ट

(क) पिटचा भारतविषयक कायदा

(ड) विधवा पुनर्विवाह कायदा

पर्याय :

(1) ब, क, अ आणि ड

(2) क, अ, ड आणि ब

(3) ड, अ, ब आणि क

(4) ब, अ, क आणि ड

18 / 25

1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला?(2022-23)

(1) उमाजी नाईक

(2) भागोजी नाईक

(3) बाबासाहेब भावे

(4) कजारसिंग

19 / 25

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करु." हे विधान कोणाचे आहे ?(2022-23)

(1) प्र.के. अत्रे

(2) शंकरराव देव

(3) इस्मत चुगताई

(4) सुलताना जोहारी

20 / 25

खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?(2022-23)

(1) चाफेकर बंधूनी रँडचा वध केला.

(2) वांची अय्यर या क्रांतीकारकाने अॅश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले.

(3) प्रफुल्ल चाकी यांनी किंग्जफोर्ड वर गोळी घातली.

(4) रासबिहारी बोस यानी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिग्जवर बॉम्ब फेकले.

21 / 25

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण कोणी केले ?

(1) प्रा. एन. जी. रंगा. (3) शशिपद बॅनर्जी

(2) बाबा रामचंद्र. (4) साने गुरूजी

22 / 25

महात्मा गांधीनी केलेल्या सत्याग्रहांचा योग्य क्रम लावा.(2022-23)

(अ) खेडा सत्याग्रह

(ब) असहकार चळवळ

(क) दांडी यात्रा

(ड) चंपारण्य सत्याग्रह

पर्याय :

(1) ब, ड, क आणि अ

(2) ड, क, अ आणि ब

(3) ड, अ, ब आणि क

(4) अ, ड, क आणि ब

23 / 25

त्रिमंती योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ब्रिटिश मंत्र्याच्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?(2022-23)

(1) पॅथिक लॉरेन्स

(2) स्टॅफर्ड क्रिप्स

(3) ए.व्ही.अलेक्झांडर

(4) लॉर्ड माऊंटबॅटन

24 / 25

सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेले व ब्रिटीश सरकारनी फाशी दिलेल्या क्रांतीकारकांची नावे दिली आहेत. त्यामधील चुकीचे नाव ओळखा.(2022-23)

(1) मल्लापा धनशेट्टी

(2) शंकर शिवदारे

(3) श्रीकृष्ण सारडा

(4) कुर्बान हुसैन

25 / 25

इ.स. 1756 साली बंगालच्या नवाबपदी कोण आले?

(1) सिराज उ‌द्दौला

(2) मीर जाफर

(3) मीर कासीम

(4) शुजा उद्दौला

Your score is

The average score is 28%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *