Nmms Question Paper | 8th Class NMMS Question Paper | NMMS इतिहास सराव टेस्ट

Nmms Question Paper

NMMS परीक्षेला सामोरे जातांना Nmms Question Paper चा जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करावा लागतो.त्यात महत्वाचे म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका सोडवणे.

टेस्ट पेपर सोडवून झाल्यानंतर आपल्या मित्रांना देखील नक्कीच शेअर करा.

0%
24

एकुण वेळ 90 मिनिटे आहे.पेपर काळजीपुर्वक सोडवा
या प्रश्नावरून नक्कीच अभ्यासाची योग्य दिशा कळेल.

All The Best👍


Created by Govind Gore
Nmms Question Paper

इतिहास PYQ प्रश्न : 2019 ते 2024

आजची टेस्ट खुप महत्वाची आहे...ज्यात तुम्हाला परिक्षेत येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचा Pattern समजेल. काळजीपुर्वक पेपर सोडवा. एकुण वेळ 90 मिनिटे असेल.आणि गुण किती मिळाले ते नक्की Comment करा

आजचा सराव पेपर सोडवण्यासाठी खालील START बटणावर क्लिक करा 👇👇👇

1 / 90

पानिपतची तिसरी लढाई कधी झाली ?
(2019-20)
(1) 1526

(2) 1556

(3) 1760

(4) 1761.

2 / 90

1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची अधिकृत घोषणा कोणी केली ?
(2019-20)
(1) पं. जवाहरलाल नेहरू

(2) इंदिरा गांधी

(3) यशवंतराव चव्हाण

(4) शंकरराव चव्हाण

3 / 90

कोणत्या योजनेच्या आधारे 18 जुलै 1947 रोजी इंग्लंडच्या पार्लमेंटने भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा संमत केला?
(2019-20)
(1) पॅथिक लॉरेन्स

(2) स्टॅफर्ड क्रिप्स

(3) ए.व्ही. अलेक्झांडर

(4) माउंटबॅटन.

4 / 90

'भारतीय कामगार चळवळीचे जनक' असे कोणास म्हटले जाते?
(2019-20)
(1) नारायण मेघाजी लोखंडे

(2) प्रा.एन.जी. रंगा

(3) श्रीपाद अमृत डांगे

(4) साने गुरुजी.

5 / 90

पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा.(2019-20)

(क) चितगाव शस्त्रागारावरील हल्ला

(ख) काकोरी कट

(ग) काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना

(घ) रँडचा वध.

(1) (क), (ख), (ग) आणि (घ)

(2) (ख), (ग), (घ) आणि (क)

(3) (ग), (घ), (क) आणि (ख)

(4) (ম), (ग), (ख) आणि (क).

6 / 90

शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्हयात साराबंदीची चळवळ सुरू केली?
(2019-20)
(1) खेडा

(2) सोलापूर

(3) गोरखपूर

(4) अमरावती

7 / 90

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल यूगाचा कालखंड कोणता?
(2019-20)
(1) 1857 से 1885

(2) 1885 ते 1905

(3) 1905 ते 1920

(4) 1920 ते 1947.

8 / 90

पूढील पैकी चूकीची जोडी ओळखा.(2019-20)

(1) 1782-सालबाईचा तह

(2) 1802-तैनाती फौजेचा करार

(3) 1848-सातारचे राज्य खालसा

(4) 1884-पिटचा भारत विषयक कायदा मंजूर

9 / 90

भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा.
(2019-20)
(1) लॉर्ड कॅनिंग

(2) लॉर्ड डलहौसी

(3) विल्यम जोन्स

(4) लॉर्ड बेटिक.

10 / 90

सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली ?
(2019-20)
(1) राजाराममोहन रॉय

(3) स्वामी विवेकानंद

(2) दादोबा पांडुरंग तर्खडकर

(4) महात्मा जोतीराव फुले.

11 / 90

खालील पैकी चूकिची जोडी ओळखा.(2019-20)

(1) वन्हाडची-इमादशाही

(2) विदरची कुतुबशाही

(3) विजापूरची-आदिलशाही

(4) अहमदनगरची-निजामशाही

12 / 90

मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाचा मृत्यू इ.स. 1707 मध्ये ....येथे झाला.
(2019-20)
(1) पुणे

(2) सातारा

(3) अहमदनगर

(4) औरंगाबाद

13 / 90

इ.स. 1450 च्या सुमारास जर्मनिच्या याने छपाई यंत्राचा शोध लावला,
(2019-20)
(1) जोहान्स गुटेनबर्ग

(2) बार्थोलोम्यू डायस

(3) ख्रिस्तोफर कोलंबस

(4) वास्को-द-गामा

14 / 90

विसाव्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता?
(2019-20)
(1) पोवाडा

(2) छायाचित्र

(3) लोकगीत

(4) चित्रपट

15 / 90

भारतातील तरुणांनी 'उठा जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका' हा संदेश कोणी दिला?
(2020-21)
(1) स्वामी दयानंद सरस्वती

(2) गोपाळ हरी देशमुख

(3) स्वामी विवेकानंद

(4) वीरेशलिंगम पंतलू

16 / 90

व्हॉईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधीची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा असा आग्रह कोणी भरला?
(2020-21)
(1) मुझफर हुसैन

(2) महात्मा गांधी

(3) सिराज-उल-हसन

(4) बॅरिस्टर जीना

17 / 90

नागपूर करारामध्ये 1956 च्या संविधानातील दुरुस्तीप्रमाणे कलम 371(2) नुसार खालीलपैकी कोणत्या अटीचा समावेश नाही?
(2020-21)
(1) विकास कार्यासाठी अतिरिक्त निधी

(2) तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणासाठी पुरेसा निधी

(3) लोकसंख्येच्या प्रमाणात राज्य शासनाच्या सेवेत नोकऱ्यांची संधी

(4) महाराष्ट्र विधानसभेचे वार्षिक अधिवेशन नागपूरला घेणे

18 / 90

अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली?
(2020-21)
(1) हिंदूस्थान सोशलिस्ट रिपब्लीकन असोसिएशन

(2) गदर

(3) अभिनव भारत

(4) अनुशीलन समिती

19 / 90

'महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते, तर ते साच्या राष्ट्राचे होते'..... हे उद्‌गार कोणाचे ?
(2020-21)
(1) पं. जवाहरलाल नेहरू

(2) महात्मा फुले

(3) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(4) लोकमान्य टिळक

20 / 90

पुढील घटनांच्या योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा.
(2020-21)
1. शिकागो धर्मपरिषदेत नेतृत्व

II. पहिली मुलींची शाळा सुरू

III. आर्य समाजाची स्थापना

IV. हिंदू महासभेची स्थापना

(1) III, I, II, IV

(2) II, III, I, IV

(3) IV, I, III, II

(4) II, I, III, IV

21 / 90

आजच्या मध्यप्रदेशातील माळवा भागात आपली ठाणी मजबूत करण्यासाठी बाजीरावाने कोणाच्या नेतृत्वाखाली मराठा सरदार पाठविले?
(2020-21)
(1) मल्हारराव होळकर

(2) राणोजी शिंदे

(3) उदाजी पवार

(4) चिमाजी आप्पा

22 / 90

"या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री-पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत, असे समजले पाहिजे आणि स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून वागले पाहिजे......" हे विधान कोणी केले ?
(2020-21)
(1) मौलाना आझाद

(2) महात्मा गांधी

(3) पंडित नेहरू

(4) सरदार वल्लभभाई पटेल

23 / 90

भारतातील शेवटचे गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय खालीलपैकी कोण?
(2020-21(
(1) लॉर्ड रिपन

(2) लॉर्ड डलहौशी

(3) लॉर्ड कैनिंग

(4) लॉर्ड बेंटिंग

24 / 90

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये कोणते वृत्तपत्र सुरू केले?(2020-21)

(1) मूकनायक

(2) बहिष्कृत भारत

(3) जनता

(4) प्रबुद्ध भारत

25 / 90

कायदेभंगाच्या चळवळीमध्ये सहभागी महिला सत्याग्रहींची नावे दिली आहेत. यांपैकी कोण कायदेभंगाच्या चळवळीशी संबंधित नव्हते ते लिहा.
(2020-21)
(1) कमलादेवी चटोपाध्याय

(2) अवंतिकाबाई गोखले

(3) हंसाबेन मेहता

(4) अरुणा असफ अली

26 / 90

दादरा नगर हवेली येथील पोर्तुगीज वसाहती मुक्त करण्यासाठी कोणत्या दलाची उभारणी करण्यात आली?(2020-21)

(1) ऑपरेशन पोलो

(2) आझाद हिंद संघ

(3) आझाद गोमंतक

(4) तुफान सेना

27 / 90

आंतरराष्ट्रीय साम्यवादी चळवळीत सक्रिय सहभाग कोणी घेतला?(2020-21)

(1) भिकाजी कामा

(2) मानवेंद्रनाथ राय

(3) रासबिहारी चोस

(4) पं. श्यामजी कृष्ण वर्मा

28 / 90

1920 मधील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनातील ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यामधील चुकीचा पर्याय कोणता?(2020-21)

(1) शासकीय कार्यालये

(2) न्यायालये

(3) स्वदेशी वस्तू

(4) सरकारी शाळा व महाविद्यालय

29 / 90

कवायती फौजेच्या बळावर रोहिले, जाट, बुंदेले यांना नमवणारे मराठा सरदार कोण होते?(2021-22)

(1) मल्हारराव होळकर

(2) परसोजी भोसले
(3) नाना फडणवीस

(4) महादजी शिंदे

30 / 90

छत्रपती शिवाजी महाराजांवर 1869 साली कोणी पोवाडा लिहिला?(2021-22)

(1) लोकमान्य टिळक

(2) रविंद्रनाथ टागोर

(3) महात्मा ज्योतीराव फुले

(4) पितामह सुब्रमण्यम भारती

31 / 90

युरोपिय दर्यावर्दी भारताकडे जाणाऱ्या जलमार्गाचा शोध घेण्यासाठी कोणत्या शतकात सागरी सफरीवर निघाले होते ?(2021-22)

(1) 15 वे शतक

(2) 16 वे शतक

(3) 17 वे शतक

(4)18 वे शतक

32 / 90

महर्षि विठ्ठल रामजी शिंदे हे कोणत्या समाजाचे सदस्य होते?(2021-22)

(1) आर्य समाज

(2) सत्यशोधक समाज

(3) प्रार्थना समाज

(4) ब्राम्हो समाज

33 / 90

शिवाजी महाराजांनी विविध खात्यांच्या प्रमुख पदी नामवंत व्यक्तीची निवड केली होती. त्यामधील चुकीच्या जोडीचा पर्याय ओळखा.
(2021-22)
(1) बहिर्जी नाईक - हेर खाते
(2) मोरेश्वर पंडीतराव - न्यायाधीश
(3) दौलतखान - आरमाराचे प्रमुख अधिकारी
(4) हंबीरराव मोहिते - घोडदळाचे सरनोबत

34 / 90

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव यांनी मुंबई महापालिकेत मांडला.(2021-22)

(1) आचार्य अत्रे

(2) सेनापती बापट

(3) शंकरराव देव

(4) एस. एम. जोशी

35 / 90

'सोमवंशीय मित्र' हे मासिक कोणी सुरू केले?(2021-22)

(1) गोपाळबाबा वलंगकर

(2) महर्षि विठ्ठल रामजी शिंदे

(3) पेरियार रामस्वामी नायकर

(4) शिवराम जानबा कांबळे

36 / 90

'लोकांमध्ये जनजागृती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणे' हा खालीलपैकी कोणत्या समाजाचा उद्देश होता?(2021-22)

(1) भारत सेवक समाज

(2) प्रार्थना समाज

(3) आर्य समाज

(4) सत्यशोधक समाज

37 / 90

पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा.(2021-22)

1) प्रिन्स ऑफ वेल्सचे हरताळ पाळून मुंबईत स्वागत

II) जालियनवाला बाग हत्याकांड

III) असहकार चळवळ स्थगित

IV) राष्ट्रीय सभेअंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना

(1) II, I, III, IV

(3) II, III, IV, I

(2) III, II, IV, I

(4) 1, III, IV, II

38 / 90

मुंबई येथील मणिभवन आश्रमास भेट दिल्यावर आपल्याला कोणत्या महान व्यक्तिच्या इतिहासाविषयी माहिती मिळते ?(2021-22)

(1) स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर

(2) महात्मा ज्योतीराव फुले

(3) लोकमान्य टिळक

(4) महात्मा गांधी

39 / 90

गोपाळ हरि देशमुख यांनी कोणत्या साप्ताहिकातून लिहिलेली शतपत्रे यामधून सामाजिक व सांस्कृतिक विषयावर भाष्य केले आहे?(2022-23)

(1) प्रभाकर

(3) जनता

(2) निबंधमाला

(4) ज्ञानोदय

40 / 90

'सेफ डिपॉझिट लॉकर सिस्टिम' हे युद्धतंत्र खालीलपैकी कोणी वापरले.
(2022-23)
(1) खंडेराव दाभाडे

(3) नेमाजी शिंदे

(2) धनाजी जाधव

(4) महाराणी ताराबाई

41 / 90

अफजलखानाच्या पारिपत्यानंतर शिवाजी महाराजांनी आदिलशाहीतील कोणते किल्ले जिंकून घेतले ते खाली दिले आहेत.
त्यामधील चुकीचा पर्याय लिहा.(2023-24)

(1) वसंतगड

(2) भूदरगड

(3) पन्हाळा

(4) खेळणा

42 / 90

महात्मा गांधीजीना अभिप्रेत असलेल्या सत्याग्रहाचे खालीलपैकी कोणते उद्दिष्ट्ये नाही?(2022-23)

(1) सत्याचा, न्यायाचा आग्रह धरणे,

(2) अन्याय करणाऱ्या व्यक्तीचे मतपरिवर्तन करणे.

(3) अहिंसेच्या मागनि सत्य व न्याय याची जाणीव करुन देणे.

(4) हिंसा व असत्याचा वापराने न्याय मिळविणे.

43 / 90

खालील घटना कालानुक्रमे लिहा.(2023-24)

(अ) पूणे करार

(ब) पेशावरचा सत्याग्रह

(क) दुसरी गोलमेज परिषद

(ड) क्रिप्स योजना

पर्याय :

(1) अ, ब, क आणि ड

(2) ब, क, अ आणि ड

(3) क, ब, अ आणि ड

(4) क, ड, अ आणि ब

44 / 90

खालील घटना कालानुक्रमे लिहा.(2022-23)

(अ) सतीबंदिचा कायदा

(ब) रेग्युलेटिंग अॅक्ट

(क) पिटचा भारतविषयक कायदा

(ड) विधवा पुनर्विवाह कायदा

पर्याय :

(1) ब, क, अ आणि ड

(2) क, अ, ड आणि ब

(3) ड, अ, ब आणि क

(4) ब, अ, क आणि ड

45 / 90

1857 साली खानदेशात कोणाच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला?(2022-23)

(1) उमाजी नाईक

(2) भागोजी नाईक

(3) बाबासाहेब भावे

(4) कजारसिंग

46 / 90

महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करायला आपण प्राणपणाने विरोध करु." हे विधान कोणाचे आहे ?(2022-23)

(1) प्र.के. अत्रे

(2) शंकरराव देव

(3) इस्मत चुगताई

(4) सुलताना जोहारी

47 / 90

खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?(2022-23)

(1) चाफेकर बंधूनी रँडचा वध केला.

(2) वांची अय्यर या क्रांतीकारकाने अॅश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले.

(3) प्रफुल्ल चाकी यांनी किंग्जफोर्ड वर गोळी घातली.

(4) रासबिहारी बोस यानी व्हाइसरॉय लॉर्ड हार्डिग्जवर बॉम्ब फेकले.

48 / 90

पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी पंढरपूर येथे आमरण उपोषण कोणी केले ?

(1) प्रा. एन. जी. रंगा. (3) शशिपद बॅनर्जी

(2) बाबा रामचंद्र. (4) साने गुरूजी

49 / 90

महात्मा गांधीनी केलेल्या सत्याग्रहांचा योग्य क्रम लावा.(2022-23)

(अ) खेडा सत्याग्रह

(ब) असहकार चळवळ

(क) दांडी यात्रा

(ड) चंपारण्य सत्याग्रह

पर्याय :

(1) ब, ड, क आणि अ

(2) ड, क, अ आणि ब

(3) ड, अ, ब आणि क

(4) अ, ड, क आणि ब

50 / 90

त्रिमंती योजना भारतीय नेत्यांसमोर मांडणाऱ्या ब्रिटिश मंत्र्याच्या शिष्टमंडळामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता?(2022-23)

(1) पॅथिक लॉरेन्स

(2) स्टॅफर्ड क्रिप्स

(3) ए.व्ही.अलेक्झांडर

(4) लॉर्ड माऊंटबॅटन

51 / 90

सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये आघाडीवर असलेले व ब्रिटीश सरकारनी फाशी दिलेल्या क्रांतीकारकांची नावे दिली आहेत. त्यामधील चुकीचे नाव ओळखा.(2022-23)

(1) मल्लापा धनशेट्टी

(2) शंकर शिवदारे

(3) श्रीकृष्ण सारडा

(4) कुर्बान हुसैन

52 / 90

इ.स. 1756 साली बंगालच्या नवाबपदी कोण आले?

(1) सिराज उ‌द्दौला

(2) मीर जाफर

(3) मीर कासीम

(4) शुजा उद्दौला

53 / 90

पुण्यातील अनाथ बालिकाश्रमास भेट दिल्यास आपणांस कोणत्या महान नेत्यांची आठवण होते.(2023-24)

(1) गोपाळ हरी देशमुख

(2) धोंडो केशव कर्वे

(3) विठ्ठल रामजी शिंदे

(4) विरेशलिंगम पंतलु

54 / 90

श्री शिवभारत हे संस्कृत मधील शिवचरित्र कोणी लिहिले?(2023-24)

(1) तुळशीदास

(2) महाकावती

(3) कवी परमानंद

(4) निकोलस मनुची

55 / 90

कोणत्या किल्ल्यास छत्रपती शिवाजी महाराजांनी विशालगड असे नाव दिले? (2023-24)

(1) वसंतगढ

(2) पावनगढ

(3) लोहगढ

(4) खेळणा

56 / 90

शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक कोणी लिहिले.(2023-24)

(1) लाला लजपत राय

(2) रवींद्रनाथ टागोर

(3) लोकमान्य टिळक

(4) महात्मा फुले

57 / 90

बंगाल प्रांतातील जहालमतवादी विचारांचे मुखपत्र.(2023-24)

(1) हिंदू पेट्रीयट

(2) प्रभाकर

(3) यंग इंडिया

(4) अमृत बझार पत्रिका

58 / 90

राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्णय कोणत्या योजनेनंतर घेतला.(2023-24)

(1) वेव्हेल योजना

(2) क्रिप्स योजना

(3) माऊंट बॅटन योजना

(4) त्रीमंत्री योजना

59 / 90

खालीलपैकी कोणत्या सत्याग्रहाच्या वेळी ब्रिटिश सरकारने लष्करी कायदा जारी केला?(2023-24)

(1) सोलापूरचा सत्याग्रह

(2) पेशावर सत्याग्रह

(3) धारासणा सत्याग्रह

(4) रौलट कायदयाविरुद्धचा सत्याग्रह

60 / 90

नेहरू अहवालाच्या प्रस्तावाशी संबंधीत खाली पर्याय दिले आहेत. त्यात चुकीचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.(2023-24)

(1) प्रौढ मतदान पद्धती लागु करावी.

(2) जबाबदार राज्य पद्धती द्यावी.

(3) भारतीयांना मुलभूत नागरी हक्क दयावेत.

(4) भाषांवर प्रांतरचना करावी.

61 / 90

पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा.(2023-24)

(i) लोकमान्य टिळकांनी भाषावर प्रांतरचनेची मागणी केली.

(ii) इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली.

(iii) राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला.

(iv) दार कमीशनची स्थापना

(1) (ii)(i), (iv), (iii)

(2) (iii), (ii), (i), (iv)

(3) (iv), (iii), (ii), (i)

(4) (i), (iv), (iii), (ii)

62 / 90

स्वातंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश कोणत्या साली झाला?

(1) 1954

(2) 1961

(3) 1947

(4) 1948

63 / 90

चित्रामध्ये दाखवलेली व्यक्ति खालीलपैकी कोणत्या घटनेशी जगप्रसिद्ध आहे?(2023-24)

(1) छपाई यंत्राचा शोध

(2) जगप्रसिद्ध चित्रकार

(3) गिरणी कामगार चळवळ

(4) धर्मसुधारणा चळवळीचा जनक

64 / 90

खालीलपैकी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली असलेला पर्याय लिहा.(2023-24)

(1) यानम

(2) माहे

(3) दमण

(4) चंद्रनगर

65 / 90

आयटकच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?(2023-24)

(1) श्रीपाद अमृत डांगे

(2) लाला लजपतराय

(3) ना. म. जोशी

(4) मुझफ्फर अहमद

66 / 90

भारतीय चित्रपटसृष्टीची मुहर्तमेढ दादासाहेब फाळकेनी ..... साली रोवली.

(1) इ. स. 1913

(2) इ. स. 1915

(3) इ. स. 1917

(4) इ. स. 1919

67 / 90

मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजचे रुपांत्तर कोणत्या विद्यापीठात झाले ?(2023-24)

(1) बनारस हिंदू विद्यापीठ

(2) अलिगढ मुस्लीम विद्यापीठ

(3) द् मोहम्मदन लिटररी सोसायटी

(4) पतित पावन मंदिर

68 / 90

मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा कोण?(2024-25)

(1) हुमायून

(2) जहाँगीर

(3) अकबर

(4) शाहजहान

69 / 90

जे.व्ही.पी. समितीत..... यांचा समावेश होता.(2024-25)

(1) जयंत पाटील

(2) पट्टाभिसीतारामय्या

(3) वसंतराव नाईक

(4) वसंतदादा पाटील

70 / 90

बॉम्ब तयार करण्याशी संबंध जोडण्यात सरकारला अपयश आल्याने न्यायालयाने निर्दोष सोडलेले क्रांतीकारक कोण?

(1) अरविंद घोष

(2) रासबिहारी बोस

(3) खुदीराम बोस

(4) सुभाषचंद्र बोस

71 / 90

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ....... मध्ये 'बहिष्कृत भारत' हे वृत्तपत्र सुरु केले.(2024-25)

(1) एप्रिल 1917

(2) एप्रिल 1927

(3) एप्रिल 1937

(4) एप्रिल 1947

72 / 90

पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहा.(2024-25)

(i) फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला.

(ii) ब्रिटीश इस्ट इंडीया कंपनीची स्थापना

(iii) प्लासी येथे नवाब शिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली.

(iv) बिल ऑफ राईट्समुळे राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या.

(1) (ii, i, iv, iii)

(2) (iv, ii, i, ii)

(3) (iii, ii, i, iv)

(4) (ii, iv, iii, i)

73 / 90

स्वःभाषा, स्वसंस्कृती विषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती केली ?

(1) वृत्तपत्रे सुरु केली

(2) शिक्षणसंस्था स्थापन केल्या

(3) जनतेला कृतीशील बनविले

(4) विविध उत्सवांचे आयोजन

74 / 90

ओडिशामध्ये इंग्रजाविरुद्ध पाईकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले ?(2024-25)

(1) बक्षी जगनबंधू विद्याधर

(2) कजारसिंग

(3) उमाजी नाईक

(4) तात्या टोपे

75 / 90

श्री बसवेश्वरानी खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार केला? (2024-25)

(1) महाराष्ट्र

(3) पंजाब

(3) बंगाल

(4) कर्नाटक

76 / 90

बेटी बंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातिभेद समूळ नष्ट होणार नाही' अशी धारणा कोणाची होती?(2024-25)

(1) महात्मा फुले

(2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

(3) राजर्षी शाहू महाराज

(4) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

77 / 90

थोरल्या बाजीरावाने ..... यांना उत्तरेस सरदार म्हणून नेमले.(2024-25)

(1) राणोजी शिंदे

(2) जयाप्पा शिंदे

(3) दत्ताजी शिंदे

(4) महादजी शिंदे

78 / 90

देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहा.

(1) महाराष्ट्र सातारा

(2) बिहार भागलपूर

(3) उत्तर प्रदेश महिमानगड

(4) बंगाल मिदनापूर

79 / 90

भारतातील हे सर्वात मोठे संस्थान होते.(2024-25)

(1) जुनागड

(2) काश्मीर

20/48

(3) औंध

(4) हैदराबाद

80 / 90

त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते ते खालील पर्यातून निवडून लिहा.(2024-25)

(1) लॉर्ड वेव्हेल

(2) पॅथिक लॉरेन्स

(3) स्टॅफर्ड क्रिप्स

(4) ए. व्ही. अलेक्झांडर

81 / 90

सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजीनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला?

(1) खेडा सत्याग्रह

(2) रौलट सत्याग्रह

(3) अहमदाबाद कामगार लढा

(4) चंपारण्य सत्याग्रह

82 / 90

1765 साली बंगालमध्ये ...... ने दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली.(2024-25)

(1) लॉर्ड कॉर्नवालिस

(2) लॉर्ड डलहौशी

(3) रॉबर्ट क्लाईव्ह

(4) विल्यम जोन्स

83 / 90

संविधानाने 'शिक्षण' या विषयावर कायदा करण्याचा अधिकार कोणत्या कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट केला आहे?

(1) संघ सुची

(2) शेष सुची

(3) समवर्ती सुची

(4) राज्य सुची

84 / 90

राज्यसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. त्यात चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.

(1) दर दोन वर्षांनी 1/3 सभासद निवृत्त होतात.

(2) सदस्यांची संख्या 250 असते.

(3) सदस्याच्या कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.

(4) जनतेकडून सदस्यांची थेट निवड होते.

85 / 90

भारतातील सर्वच घटक राज्यांच्या शासन यंत्रणेचे राजकिय स्वरुप सारखेच आहे, अपवाद आहे फक्त.......

(1) झारखंड

(2) आसाम

(3) जम्मू आणि काश्मीर

(4) अरुणाचल प्रदेश

86 / 90

नोकरशाहीत विसंगत असलेले काम ओळखा.

(1) कायदा व सुव्यवस्था राखणे.

(2) पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करणे.

(3) निवडणूकीत उभे असणाऱ्या उमेदवाराना मदत करणे

(4) कर गोळा करुन सरकारी तिजोरीत जमा करणे

87 / 90

भारतात एकूण किती उच्च न्यायालये आहेत?

(1) 24

(2) 23

(3) 25

(4) 26

88 / 90

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थ संकल्पाविषयीचे अधिवेशन....येथे होते.

(1) मुंबई

(2) नागपूर

(3) औरंगाबाद

(4) पुणे

89 / 90

शासनाच्या प्रशासन यंत्रणेतील सनदी अधिकाऱ्यांची पदे खाली दिली आहेत. त्यामधील विसंगत पदाचा पर्याय ओळखून लिहा.

(1) जिल्हाधिकारी

(2) महापौर

(3) तहसिलदार

(4) महानगरपालिका आयुक्त

90 / 90

लोकसभेच्या संदर्भातील विधाने खाली दिली आहेत. चुकीच्या विधानाचा पर्याय क्रमांक ओळखून लिहा.

(1) जनतेकडून प्रतिनिधींची थेट निवड.

(2) सदस्यांची संख्या निश्चित असते.

(3) सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो.

(4) निवडणुका ठराविक मुदतीनंतर होतात.

Your score is

The average score is 28%

0%

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *